तुम्हाला गृहमंत्रीपद मिळाले तर?? संजय राऊतांच्या उत्तराने तर्क वितर्काना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेस कडे असलेले हे खाते शिवसेनेला हवे आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना तुम्हांला गृहमंत्री केलं तर ?? असा प्रश्न केला असता त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ‘तुम्हाला राज्याच्या राजकारणात आणून गृहमंत्रिपद दिलं तर ते स्वीकारणार का?’ असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास थेट नकार न देता स्मितहास्य करत म्हटलं की मी राज्याच्याच राजकारणात आहे. राऊत यांनी दिलेल्या या उत्तरामुळे तर्क वितर्काना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस ला मुख्यमंत्री पद हवे असा दावा भाजपने केला होता. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हेच संपूर्ण 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. भाजपने याबाबत स्वतःला त्रास करून घेऊ नये. मानसिक यातना झाल्या तर विविध प्रकारचे झटके येतात, प्रकृतीला ताण पडतो त्यामुळे तुम्ही अडीच वर्षे शांत बसा असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी भाजपला दिले.

Leave a Comment