हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत धमकीची भाषा वापरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक धमकीवजा विधानं केली आहेत. त्यात ‘सगळ्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, ही धमकी नव्हती काय?’ असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे, असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
नक्की काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केला. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र अचिव्हमेंट काय आहे? हात धुवून मागे लागू, खिचडी शिजवू, ही कोणती भाषा? तुम्ही संविधानिक पदावर आहे. अशा प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’