राहुल गांधी सक्षम नेते, त्यांच नेतृत्व सर्वव्यापी ठरेल – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसमध्ये ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते नेतृत्व म्हणजे राहुल गांधी होय.राहुल गांधींचं नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकते. ते सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की,  काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता त्यांनी जमिनीवरचे काम सुरू करायला हवे, असे मत यावेळी संजय राऊत यांनी मांडले.

त्याचप्रमाणे भविष्यात उद्धव ठाकरे यांनी बिगरभाजपशासित राज्यांचे नेतृत्त्व करायला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. त्यांच्या ओठात आणि पोटात एकच असत .जे मनात असत तेच ते बोलतात. देशातील सर्वविरोधी पक्षांनी एकत्र येवून लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी बुधवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मांडली.

यावेळी राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्या नाराजीसंदर्भातही भाष्य केले. तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी ही असतेच. मात्र, आता संजय जाधव मुंबईत आल्यामुळे यामधून मार्ग निघेल. सध्याच्या घडीला महाविकासआघाडीत उत्तम समन्वय आहे असेही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’