हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एकीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा डोळा मुख्यमंत्री पदावर असल्याचे म्हणले जात आहे. पुढे जाऊन मुख्यमंत्री पद अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येईल अशा ही राज्यात रंगल्या आहेत. अशातच शिंदे गटाच्या राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “खरे तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते” असा दावा राहुल कनाल यांनी केला आहे.
सीसीटीव्ही फूटेज तपासा..
राहुल कनाल यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये सामानाच्या ऑफिसमध्ये 16 आमदाराची विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीत संजय राऊत यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे असल्याचे सांगितले होते. सध्या राहुल कनाल यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्य म्हणजे, या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी सामना ऑफिसमधील सीसीटीव्ही फूटेज आणि तीन वर्षांचा सीडीआर चेक करावा असे आवाहन राहुल कनाल यांनी केले आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी शिंदे गटाच्या नेत्यांनी कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. हे आरोप त्यांनी अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल यांच्यावर लावले होते. राजाने केलेल्या या आरोपावरच राहुल कनाल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना, “या घोटाळ्याप्रकरणी राऊतांनी यांनी केलेले आरोप खोटे ठरले तर राऊत राजकारणातून निवृत्ती घेतील का?” असा सवाल कनाल यांनी उपस्थित केला आहे.