हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे.त्यातच राज्यसभेत सुनेत्रा पवारांना संधी दिल्याने भुजबळांची ती संधीही गमावली. यानंतर आज त्यांनी नाराजी बोलून सुद्धा दाखवली. नाशिकमधून लढवण्याची माझी इच्छा होती, परंतु जागावाटप उशिराने झाल्याने मी माघार घेतली, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अजित दादा गटाला एक मोठा सल्ला दिला आहे. छगन भुजबळ यांच्याबद्दल एकदाच काय तो निर्णय घ्या.. त्यांना काय पाहिजे ते देऊन टाका असं त्यांनी म्हंटल आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी म्हंटल, छगन भुजबळ कोणत्या गोष्टींवर खुष होतात यावर संशोधन केलं पाहिजे. मतदारसंघाच्या वेळीही आणि आताही त्यांची नाराजी आहे. राष्ट्रवादी पक्षाचा हा अंतर्गत निर्णय असल्याने यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र पक्षातील नाराजी असली तरीही त्याचा पिरणाम महायुतीवर होतो. त्यामुळे महायुतीला हे परवडणारं नाहीय. छगन भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका. यामुळे वातावरण गढूळ होत जातंय. माझी स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.”
भुजबळ आज काय म्हणाले होते?
नाशिकची लोकसभा लढवायला मी तयार झालो होतो. दिल्लीतून तिकिट फायनल केल्यामुळे मी कामाला लागलो होतो. एक महिना झालं तरी उमेदवार जाहीर होईन. त्यामुळे म्हटलं बस झालं. समोरचा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागला आहे. मी माघार घेतल्यानंतर १५ दिवासंनी उमेदवारी जाहीर झाली. आता विधानसभेसाठी लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा असं छगन भुजबळ यांनी म्हंटल.