Sant Dnyaneshwaranchi Muktai : विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची कहाणी; रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sant Dnyaneshwaranchi Muktai) अध्यात्माबाबत बोलायचे झाले की, वारकरी संप्रदायाचा उल्लेख आवर्जून केला जातो. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई यांना भक्ती, शक्ती आणि मुक्तीचे मूर्तिमंत उदाहरण मानले जाते. यांपैकी संत मुक्ताबाईंनी आपल्या लहानग्या वयात आई- वडिलांमागे एकहाती कुटुंब सांभाळत आपल्या भावंडांची कोणत्याही अटी शर्तींशिवाय माऊली होण्याची जबाबदारी खांद्यावर घेतली. त्यांचा साधेपणा आणि भक्तीमार्गावरील वाटचाल अत्यंत प्रेरणादायी ठरली. अशा मुक्ताबाईंचा जीवनप्रवास सोपा नव्हता. मात्र, प्रेरणादायी होता. तोच आता रुपेरी पडद्यावर उलघडणार आहे.

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dnyaneshwaranchi Muktai)

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर व्हायरल होत आहेत. संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडणारा हा चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित करत आहेत. माहितीनुसार, हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली असून सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे.

पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर समोर येताच यामधून लहानपणीच्या ‘मुक्ताई’ आणि ‘ज्ञानेश्वर’ यांची झलक दिसली आहे. ज्यात आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी दिसत आहे. मुक्ताईचे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर चेतनादायी होते.



(Sant Dnyaneshwaranchi Muktai) त्यांनी लहानग्या वयात मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी आपल्या प्रवासात स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून दिले. इतकेच नव्हे तर स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. अशी मुक्ताई आपल्या भावंडांसाठी माता, भगिनी, गुरु तर कधी शिष्या झाली. अशा मुक्ताईचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहेत.

‘हे’ कलाकार साकारणार महत्वाची भूमिका

मुक्ताई आणि ज्ञानेश्वर यांचे नाते अतिशय विलक्षण होते. मुक्ताईने ज्ञानेश्वरांना आपले गुरु मानले होते. मात्र, प्रसंगी त्या ज्ञानेश्वरांना उपदेशही करत. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी केलेले वर्णन असे की, ‘मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई।।’ अशा या मुक्ताईची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे.

(Sant Dnyaneshwaranchi Muktai) यामध्ये मुख्य आणि महत्वाच्या भूमिकेत मराठी कलाकारांची दमदार फळी पहायला मिळणार आहे. ज्यात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, आदिनाथ कोठारे, अश्विनी महांगडे अशा कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.