कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
नागाबरोबर खेळ करून तो व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर करणे एका सर्पमित्र युवकावर कारवाई करण्यता आली आहे. ओगलेवाडी (ता. कराड) येथील ओंकार रामचंद्र साळुंखे (वय १९) असे संशयित युवकाला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असल्याची माहिती कराडचे परिक्षेत्र वनअधिकारी तुषार नवले यांनी दिली आहे.
याबाबतची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांनी त्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली. त्यानुसार ओंकार साळुंखे याच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पेजवर ही माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाने संबंधित युवकाची अधिक माहिती घेतली असता तो ओगलेवाडी येथे राहत असल्याचे समजले. वनविभागाच्या पथकाने त्याला शुक्रवार, 24 जून रोजी ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आला आहे.
नागाला खवळंल…सर्पमित्राला नागासोबत स्टंटचा व्हिडीओ पडला महागात@HelloMaharashtr @Forrest4Trees @Forrest4Trees pic.twitter.com/G7c1mCBdjC
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) June 25, 2022
सातारचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्यासाठी वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी वनविभागाला सहकार्य केले. नागाला वन्यजीव संरक्षक शेड्यूल्डनुसार संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नाग पकडून व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करणे गुन्हा असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.