औरंगाबाद प्रतिनिधी | फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील गावकऱ्यांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतरही सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी पदाधिकारी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या खुर्च्या जाळण्याचा प्रकार घडला आहे. प्रहार युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे यांनी हे कृत्य केले आहे.
फेसबुक लाईव्ह करुन साबळे यांनी हे कृत्य केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच 24 तासात पाणी न आल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना गाव बंदी करण्यात येईल अशा इशाराही साबळे यांनी दिलाय. साबळे यांच्या या हटके आंदोलनाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, गेवराई पायगा येथील ग्रामस्थ मागील आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची मागणी करत होते. पत्राद्वारे अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासन यावर उपाय काढू शकले नाही. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी अखेर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या खुर्च्यांना पेट्रोल टाकून जाळले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’