हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील वन्यजीव संशोधकांना नुकत्याच एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. वन्यजीव संशोधकांना सदर पाल ही तामिळनाडूमधील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाम मधील उंच डोंगरांमधील घनदाट जंगलात आढळून आली असून सातारचे संशोधक अमित सय्यद यांनी त्यांच्या वडिलांचे नाव दिले आहे.
पालींच्या विविध जातींचा अभ्यास करण्यासाठी सातारचे वन्यजीव संशोधक अमित सैय्यद आणि त्यांच्या टीमचे दोन सहकारी तामिळनाडूच्या घनदाट जंगलात कित्तेक वर्ष शोध मोहीम घेत होते. साधारण पणे समुद्र सपाटीपासून १२४५ मीटर उंच असणाऱ्या या डोंगर भागात असणाऱ्या घनदाट जंगलात २०१३ पासून संशोधनाचे काम चालू होते, सदर जंगल हे विविध लहान मोठ्या हिंस्र प्राण्यांनी भरलेले आहे. आणि ज्या भागात ही शोधमोहिम चालू होती.
त्या ठिकाणी ना प्यायच्या पाण्याची, जेवायची सोय ना राहायची सोय, इतकेच नव्हे तर येथे मोबाईलला सुध्दा कसलेच नेटवर्क न्हवते, पाऊस आला की झाडाखाली थांबत, भुक लागल्यावर जे बरोबर जेवणाचे सामान नेले आहे त्यावर गुजराण करत, त्याच बरोबर वाघ, अस्वल, आणि जंगली हत्ती सारख्या प्राण्यांच्या अधिवासात काम करावे लागत होते. २०१५ ला अमित च्या परिश्रमाला शेवटी यश आले आणि ही पाल सापडली, नंतर या पालीवर प्रयोग शाळेत संशोधन करून तीच्या सर्व अवयवांचा, तीच्यावर असणाऱ्या खवल्यांचा व जनुकीय अभ्यास अमितने सुरू केला.
शास्त्रीय अभ्यासातून नक्की झाले की ही पाल नवीन असुन वन्यजीव शास्त्रात याची अजुन नोंदच नाही. अमित सैय्यद यांनी या पालीला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे ठरवले. प्रो. रशीद सैय्यद हे अमित चे वडील आसूंन “निमाम्स्पिस रशिदी” असे या पालीचे नाव ठेवण्यात आले.
आज या पालीचे संशोधन बद्दल संशोधन पत्रिका “एशियन जर्नल ऑफ कंजर्वेशन बायोलॉजी” या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. “निमास्पिस रशिदी” ही पाल त्याच्यावर असणाऱ्या पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या रंग छटामुळे दिसायला अतिशय सुंदर दिसते. सदर संशोधनामध्ये अमित सैय्यद यांचे बरोबर सॅमसन किरूबाकरण, राहुल खोत, थानीगैवल ए, सतीशकुमार, आयान सय्यद, मासूम सय्यद, जयदीत्या पूरकायास्ता, शुभंकर देशपांडे आणि शवरी सुलाखे हे सहभागी होते.