सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील राजसपुरा पेठ या ठिकाणी राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या घरामध्ये घुसून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी आता सातारा शहर पोलिसांनी एक संशयित आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 मार्च रोजी 5:45 वाजण्याच्या सुमारास राजसपुरा पेठ सातारा येथे राहणाऱ्या श्रीमती बीबीहय्या बशीरभाई भगवान (वय 63) यांच्याघरात अनोळखी एक महिला व एका युवकाने प्रवेश केला. तसेच वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन कात्रीच्या साहयाने कट करून जबरदस्तीने नेली होती. याबाबत बीबीहय्या बशीरभाई भगवान यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
Satara News : वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक
सातारा शहर पोलीसांची कामगिरी : 50 हजाराचा मुद्देमाल हस्तगत pic.twitter.com/wV636jRmGU— santosh gurav (@santosh29590931) April 1, 2023
संबंधित गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस बापू बांगर यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे बी पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एका इसमास ताब्यात घेतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचेसोबत असणाऱ्या एका महिलेने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. यावेळी त्याच्याकडे गुन्हयातील चोरी केलेली सोन्याची चैन आढळून आली ती पोलीसांनी जप्त केली आहे.




