सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 875 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 376 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 14 हजार 780 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 76 हजार 663 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 57 हजार 944 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 887 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 23 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
निर्बंध शिथिल केल्यानंतर बाजारपेठात गर्दी
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात निर्बंध लावले होते. आजपासून ते निर्बंध शिथील करण्यात आले. बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसत आहे. गर्दी करणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे, तरी नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये व बाजारपेठांमध्ये गर्दी करु नये व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.