सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण स्थिर : नवे 1 हजार 588 पाॅझिटीव्ह, दीड लाख बरे झाले

Satara corona patient
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 588 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 337 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 265 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 72 हजार 433 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 50 हजार 389 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 730 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 28 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याला कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आवाहन
राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये जिद्द निर्माण व्हावी आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने ‘कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. स्पर्धेत सहभागी गावांना विविध २२ निकषांवर ५० गुण देण्यात येणार आहेत.