सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला! आज पुन्हा ५ रुग्णांची वाढ, कोरोनग्रस्तांची संख्या पोहोचली ७४ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

साताऱ्यात पुणे कारागृहातून आलेले दोन, कराड मध्ये कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, कोरेगाव आणि फलटण मध्ये प्रत्येकी एका रुग्णाचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्यासाठी धोका वाढला असून जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७४ वर पोहोचली आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे कारागृहातून सातारा येथे प्रवास करुन आलेले २, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे बाधित रुगणाच्या निकट सहवासित १ व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे कराड येथून प्रवास करुन आलेला १ आणि कराड येथे १ मे रोजी रात्री उशिरा सापडलेले १५ जण अशा एकूण १९ जणांचे अहवाल कोविड-19 बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यात 64 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 74 बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील एकट्या कराड तालुक्यात तब्बल ५७ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 18, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 20, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 12, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 व वाई येथील 1 असे एकूण 64 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, काळ दिवसभरात कराड मध्ये वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. तसेच एका गर्भवती महिलेसह तिचा एक निकटवर्तीयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा २ जण कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली. नंतर रात्री उशिराने पुन्हा कराड तालुक्यात कोरोनाचे नवे १४ रुग्ण सापडले. आता आज सकाळी जिल्ह्यात पुन्हा पाच जण कोरोना पॉजिटीव्ह सापडल्याने सातारकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इत्तर महत्वाच्या बातम्या –

तळीरामांसाठी गुड न्यूज वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

केंद्राची मोठी घोषणा! लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणार

खुशखबर! घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर झाला स्वस्त

राज्यात दिवसभरात १००८ नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ११ हजार ५०६ वर