Saturday, February 4, 2023

धक्कादायक! महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात परतलेल्या ७ मजुरांना कोरोनाची लागण

- Advertisement -

नवी दिल्ली । केंद्र सरकारनं लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यात अडकलेल्या मजूर-कामगारांना घरी जाण्याची मुभा दिली. या निर्णयानंतर अनेक कामगार आता घरी परतू लागले आहेत. मात्र ज्या गोष्टीची भीती वाटतं होती तेच घडत असल्याचा इशारा देणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशमध्ये पोहोचलेल्या कामगारांपैकी ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. उत्तरप्रदेशातील बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

उत्तर प्रदेश सरकारनं विविध राज्यात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी बस सोडल्या होत्या. त्यामाध्यमातून विविध राज्यातील कामगारांना परत नेण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारनं महाराष्ट्रातून कामगारांना बसेसनं घरी पोहोचवलं होतं. या कामगारांची तपासणी केल्यानंतर, यात ७ जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. हे कामगार झाशी मार्गे बस्ती जिल्ह्यात दाखल झाले होते. बस्तीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.

- Advertisement -

३ मे रोजी लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्याची मुदत संपणार होती. मात्र, केंद्र सरकारनं काही राज्यांची मागणी लक्षात घेऊन लॉकडाउन २ आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. हा निर्णय घेण्यापूर्वी विविध राज्यांनी कामगारांना परत नेण्याच्या मागणीचीही दखलही केंद्रानं घेतली. त्यामुळे राज्यांनी विविध राज्यात अडकलेले आपापल्या राज्यातील कामगार, विद्यार्थ्यांसह नागरिकांना परत नेण्याचं काम सुरू केलं आहे. कामगारांसाठी विशेष गाड्याही रेल्वे मंत्रालयानं सोडल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”