सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा नगरपरिषदेच्या स्थायी समितीमध्ये हद्दवाढ भागासह, शहरातील महत्वाच्या विविध कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. लोकहिताच्या कामांना प्राधान्य देत सातारा विकास आघाडीने गतीमान विकास साधण्याचा सर्वतोप्रयत्न केला आहे, अशी माहीती सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य मनोज शेंडे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी नमुद केले आहे की, सातारा नगरपरिषदेच्या स्थायी समितीची सभा आज समितीच्या कक्षात पार पडली. या सभेत एकूण 400 विविध विकास कामांचे आणि नगरपरिषदेच्या प्रशासनाशी संबंधीत विषय निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. हे सर्व विषयी मंजूर करण्यात आले असून, निकडीच्या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नागरिकांच्या लोकहितासाठी नगरपरिषदेने वेळोवेळी जरुर आवश्यक असणाऱ्या सक्षम मंजूरीने कार्यक्षमपध्दतीने विविध विषय मार्गी लावेलेले आहेत. याचा लाभ अंतिमदृष्टया हद्दवाढ भागासह सातारा शहरातील नागरिकांना होणार आहे असेही मनोज शेंडे यांनी शेवटी नमुद केले आहे