सातारकरांना दिलासा! आज चौथा रुग्ण कोरोनातून बरा होऊन घरी परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आज क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातून जिल्ह्यातला चौथा रुग्ण कोरोनामुक्त होऊन बाहेर पडला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामुळे सातारकरांना दिलासा मिळाला असून आत्तापर्यंत एकुन ४ कोरोना रुग्ण ठणठणीत झाले आहेत.

सदर रुग्णाला मोठ्या उत्साहात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांनी शुभेच्छा देत डिसार्ज दिला. उत्तम आरोग्यासाठीच्या सदिच्छा घेतल्यानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून हा युवक त्याच्या घरी गेला. पुढचे चौदा दिवस त्याला घरीच इतरांपासून अलिप्त ( होम कोरंटाईन ) राहावे लागणार आहे.

दरम्यान, शनिवारी कराड तालुक्यात कोरोनाचे एकाच दिवशी १२ रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याने कोरोनाला आळा घालण्यात सातारकर यशस्वीत होताना दिसत आहेत. खबरदारी म्हणुन नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.