सातारा जिल्हा बॅंक निवडणूक : ठरावदार पर्यटनाला गेल्याने उमेदवारांवर शोधण्याची वेळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

सातारा जिल्हा बॅंकेत 10 जागांसाठी निवडणूक लागली आहे. कराड, जावळी मतदार संघात प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे आपले ठरावदार मतदार विरोधी उमेदवाराला मिळू नयेत, यासाठी पर्यटनासाठी रवाना झालेले आहेत. काल पत्रकार परिषदेत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मतदार भेटत नसल्याचे शेवटी बोलून गेले. या प्रकरामुळे ठरावदार मतदारांना शोधण्याची वेळ उमेदवारांना आल्याचे चित्र पहायला मिळून येत आहे.

कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. तर त्याच्याविरोधात कै. विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे व राष्ट्रवादीचेच ज्ञानदेव रांजणे यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही लढती या जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादी नेत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरलेल्या आहेत.

सातारा जिल्हा बॅंकेत अॅड. उदसिंह पाटील यांनी काहीही झालेले तरी आपण लढणारच ही भूमिका घेतली आणि पहिल्याच दिवशी अर्जही दाखल केला. त्यानंतर सहकारमंत्री यांनीही याच मतदार संघातून अर्ज दाखल केला अन् त्या दिवसापासून मतदारांच्या गाठीभेटीवरही भर दिला. भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्या गटातील मतदारांना प्रामुख्याने भेटण्यावर अधिक भर दिला. दुसरीकडे अॅड. उदसिंह पाटील यांनी आपल्या उंडाळकर गटाच्या निष्ठावंताना एकत्र केले. अॅड. उदसिंह पाटील- उंडाळकर यांच्या विजयासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा कामाला लावलेली आहे.

जावली सोसायटी गटातून पक्षांतर्गत दुफळी असल्याचे दिसून आले. पक्षातंर्गत ही दुफळी कोणी निर्माण केली अन् का हे शशिकांत शिंदे हे जाणून आहेत. अशावेळी ज्ञानदेव रांजणे आपले जवळपास 35 मतदार अज्ञातस्थळी हलविल्याची चर्चा आहे, अशीच चर्चा कराड सोसायटी गटात असून जवळपास 60 मतदार हे उंडाळकर गटाच्या विश्वासातील असून तेही पर्यटनस्थळी गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच काल पत्रकार परिषदेत सहकारमंत्री मतदार भेटत नसल्याचे बोलून गेले असावेत.

Leave a Comment