सातारा जिल्हा बॅंक : आ. मकरंद पाटील, राजेंद्र तनपुरे, शिवरूपराजे खर्डेकर तिघे बिनविरोध

सातारा | सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या सोमवारी दि. 25 रोजी शेवटच्या दिवशी तीन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता 18 जागेचा प्रश्न राहिला असून कोण- कोणा विरोधात आणि किती जागा बिनविरोध होणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी दि. 25 रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. जिल्ह्यातील दिग्गजांनी आज अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी संकेत दिले आहेत, त्याप्रमाणे या तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितले असून आता सर्वसमावेशक संचालक बॅंकेत पाठविण्यासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर बैठक होणार आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

You might also like