Thursday, March 23, 2023

परिस्थिती सुधारतेय : सातारा जिल्ह्यात मृत्यू कमी, पाॅझिटीव्ह कमी आणि कोरोनामुक्त वाढले

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 522 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 775 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 662 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 69 हजार 314 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 42 हजार 945 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3698 बाधितांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 21 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे गृह राज्यमंत्री शंभराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना

जिल्ह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शभूराज देसाई यांनी केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.