लसीकरणाचा फज्जा : सातारा जिल्ह्यातील सर्वच केंद्रावरती लसीकरणासाठी रात्रीपासून रांगाच रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

केंद्र सरकारने सर्व राज्यात लसीकरणाची मोहीम राबविलेली आहे. ऑनलाईन नोंदणी बंद केली असल्याने लोक थेट केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागलेली आहेत. लसीचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असून लसीकरणासाठी गर्दी मात्र मोठी होताना दिसत आहे. दरम्यान सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी असा लसी घेण्यासाठी नागरिक चक्क मध्यरात्री बारा वाजल्यापासून रांगा लावल्या. लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टिंगचा फज्जा उडाला.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी नागरिकांकडून शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या लसीसाठी रांगा लावल्या जात आहे. जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात मात्र, लसींचा तुटवडा भासत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. तर त्यामुळे नागरिकांनीहि लस मिळावी म्हणून शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून रांगा लावल्या असल्याने आरोग्य विभागाची एकच धांदल उडून गेली आहे.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सोशल डिस्टिंगचे पालन करण्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या सातारा शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातच रविवारी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. रविवारी सुट्टी असल्यामुळे नागरिकांनी आदल्यादिवशी शनिवारपासूनच जिल्हा रुग्णालयातील कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावण्यास सुरवात केली. लसीकरणासाठी नंबर मिळवण्यासाठी मध्यरात्री पासूनच 200 हून अधिक नागरिकानी या ठिकाणी जेडी केली होती. लसींचा तुटवडा फास्ट असल्यामुळे रुग्णालयात लसीकरणाचे डोस वाढवण्याचीमागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Leave a Comment