Wednesday, March 29, 2023

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा संपुर्ण लाॅकडाउन; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक संचारबंदीचे आदेश

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे. संचारबंदीच्या काळात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

- Advertisement -

शुक्रवारी मध्यरात्री पासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर परिसरातही सदरील आदेश लागू होणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व दुकाने व इतर आस्थापने बंद राहणार आहेत. संचारबंदीच्या कालावधीत सर्व किराणामाल दुकाने, ठोक विक्रेते, इतर व्यवसाय आदी संपूर्णतः बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स हे सुद्धा यावेळी बंद राहील. वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू यांची दुकाने २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे.

Screenshot_20200714_172248_com.google.android.apps.docs.jpg

ZOMETO, SWIGGY आदी पोर्टलवरून मागवण्यात येणारे खाद्यपदार्थसेवा २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत फक्त घरपोच सेवा सुरु राहणार आहे. सार्वजनिक, खाजगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बंद राहतील. तसेच मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉक यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. सर्व केशकर्तनालये, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व भाजी मार्केट, आठवडी बाजार २२ तारखेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहेत. तर २३ तारखेपासून २६ तारखेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरु राहणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच सर्व शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहणार आहेत. मटण, चिकन, अंडी यांची विक्रीही बंद राहणार आहे. सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दोन चाकी, चार चाकी, तीन चाकी संपूर्णतः बंद राहतील. बांधकाम व कंस्ट्रक्शन कामे बंद राहतील. धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट यांची सेवा बंद राहील.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.