सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल आज कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. मृत्यू झालेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यात तब्बल ७० कोरोनाग्रस्त आहेत.
https://hellomaharashtra.in/maharashtra-news/how-karad-corona-patients-reached-upto-57-karad-corona-news/
दि. 4 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 2 सारी सदृष्य नागरिकांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच सातारा येथील ३ कोरोना बाधितांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 3 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
इतर महत्वाच्या बातम्या –
https://hellomaharashtra.in/maharashtra-news/coronavirus-cases-in-maharashtra-15525-today/
https://hellomaharashtra.in/other/who-makes-alarming-predictions-about-corona-virus-take-knowing/
https://hellomaharashtra.in/other/covid-19-israel-defense-minister-naftali-bennett-claims-we-have-developed-coronavirus-vaccine-dlaf/