सातारा जिल्ह्यात सकाळीच भूंकपाचा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. कोयनापासून 10 किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती असून या घटनेमुळे कोयणावासीय हादरून गेले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी नोंदण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोयणा परिसरात वारंवार भूकंपाच्या घटना घडतात.
जिल्ह्यातील या भूकंपाची तीव्रता मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने कमी सेकंदाचा भूंकप जाणवल्याने तीव्रता मोठी असूनही कुठलेही नुकसान झाले नाही. कोयना, कराड आणि पाटण परिसरात या भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7.48 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. सुरुवातीला काहीतरी गुढ आवाज आल्याने नागरिकांनी घराबाहेर येऊन पाहिले. मात्र, हा भूंकप असल्याचे समजताच घरातून बाहेर येत सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सर्वांचीच धावपळ झाली होती. भूकंपानंतर जिल्ह्यातील कोयना परिसरात वास्तव करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
IMD: An earthquake of magnitude 4.8 struck Satara. Maharashtra at 7:48 am today.
— ANI (@ANI) June 20, 2019