सातारा एलसीबीची कारवाई : कराड तालुक्यातील दोघांकडून देशी बनावटीच्या पिस्टल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील शिरवडे फाटा येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील व हद्दपार केलेल्या दोन संशयीतांना पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. दोघांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून सातारा एलसीबीच्या पथकाने एक लाख 50 हजारांच्या दोन देशी बनावटीच्या दोन पिस्टल जप्त केल्या. अमित हणमंत कदम (वय- 23 वर्षे रा. अंतवडी) व अल्तमेश उर्फ मोन्या हरुण तांबोळी (वय- 21 रा. मंगळवार पेठ, पालकरवाडा) अशी त्यांची नावे आहेत.

एलसीबीचे पथक शिरवडे परिसरात गस्त घालत होते. त्यांना पाहून मोन्यासहीत अमीतही पळून निघाले होते. त्यावेळी पथकाने त्याचा पाठलाग करून दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे दोन वेगवेगळी दोन देशी बनावटीच्या गावठी पिस्तल जप्त झाली आहेत. त्याची एक लाख 50 हजार इतकी किंमत आहे. एलसबीचे मोहसीन मोमीन व त्यांच्या सहकाऱ्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार हद्दपार संशयीतांवर त्यांचे लक्ष होते. त्यानुसार तालुक्यात एलसीबीच्या पथकाने पट्रोलींग असल्याने सापळा रचला होता. त्यानुसार कारवाई झाली. शिरवडेच्या हद्दीत पेट्रोलींग करताना दुपारी दोनच्या सुमारास शहापूर फाटा ते तासवडे टोलनाका रस्त्यावर रेल्वे फाटकाचे जवळ वरील दोघेही संशयीत फिरताना त्यांना आढळली. याप्रकरणी तळबीड पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

​एलसीबीचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरिक्षत रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, गणेश वाघ, सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदरा अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, प्रविण कांबळे मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, प्रविण पवार, विशाल पवार, रोहित निकम,सचिन ससाणे, केतन शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment