Wednesday, February 8, 2023

मुंबई महापालिका निवडणुक शिवसेना स्वबळावर लढणार; संजय राऊतांची घोषणा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी असली तरी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच आम्ही 100 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसवू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले, मुंबईत शिवसेनेचा विस्तार व्हावा ही शिवसेनेची भूमिका कायम आहे. म्हणून शिवसेना स्वबळावर लढत आहे. आम्ही स्वबळावर लढलो. शिवसेना मोठा पक्ष आहे. शंभरीपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही नक्कीच तयारी करतोय. मुंबई महापालिकेत शिवसेनेची ताकद असेल. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होईल.

- Advertisement -

मुंबईही शिवसेनेचं जन्मस्थान आहे. त्या महापालिकेवर शिवसेनेचं राज्य नसेल तर कुणाचं राज्य असेल? आमचंच राज्य असेल, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा दणक्यात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने दसरा मेळावा होईल हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे असे राऊतांनी म्हंटल.