सातारा : पुढचे 7 दिवस कडक Lockdown; किराणा दुकानांसह आता ‘या’ गोष्टीही राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनीधी : लाॅकडाऊन लावून सूध्दा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे, ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 4 मे पासून 10 मे पर्यंत सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. उद्या सात वाजल्यापासून ते 10 मे रोजी चे चोवीस वाजेपर्यंत आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्व किराणामाल भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी) पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद असणार आहेत. तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी 11 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात 4 मे पासून कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाची संबंधित दुकाने सकाळी सात ते सकाळी 11 या कालावधीत चालू राहतील या दुकानातून घरपोच सेवा सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी असेल.

हॉटेल रेस्टॉरंट रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. घरपोच मद्य विक्री बाबत दुपारी बारा ते सायंकाळी पाच असा वेळेत बदल करण्यात आला असून याही ठिकाणी पार्सल सेवा सुरू राहणार आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? Click Here to JOIN Our Whatsapp Group

सातारा जिल्ह्यासह राज्यातील ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment