सातारा लोकसभेचा सस्पेन्स आज संपणार?? कोणाला तिकीट मिळणार??

sharad pawar udayanraje
sharad pawar udayanraje
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही पत्ते खुले केलेले नाहीत. मात्र आज महाविकास आघाडीकडून शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि महायुतीकडून भाजप (bjp) सातारा लोकसभेच्या जागेसाठी (Satara Lok Sabha Candidate) आपल्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाकोणाला तिकीट मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं आहे.

आज भाजपची ९ वी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता तरी साताऱ्याचा उमेदवार भाजपकडून घोषित केला जाणार का ते पाहावं लागेल. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. काहीही झालं तरी आपण लोकसभा लढवणार आहोत असं म्हणत उदयनराजेंनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली तर त्यामुळे भाजप उदयनराजे यांनाच साताऱ्याचे तिकीट देण्याची शक्यता आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हंटले जाणाऱ्या नरेंद्र पाटलांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्याने नवा ट्विस्ट निर्माण झालाय. त्यामुळे भाजपकडून सातारा लोकसभेची उमेदवारी कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे आहे.

दुसरीकडे, शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्बेतीचे कारण देत यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यातच इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने शरद पवार यांच्यापुढे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झालाय. सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर अशी काही नावे आहे जे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवू शकतात. परंतु पवार कोणाच्या नावावर मोहोर उमटवतात ते पाहायला हवं. सातारा जिल्हा हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, त्यामुळे हा गड राखण्यासाठी पवार काय डावपेच आखतात? ऐनवेळी कोणता पत्ता बाहेर काढतात याकडे लक्ष्य आहे. शरद पवार गटाच्या उर्वीत ३ जागांची यादी सुद्धा आजच जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.