सातारच्या MIDCची वाट लागण्याचे कारण दिव्य खासदार : आ. शिवेंद्रसिंहराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा एमआयडीसी वाढत नाही, याला एकमेव कारण हे उदयनराजे आहेत. कारण तिथे आलेल्या माणसांना धमक्या द्यायच्या, वसूल्या करायच्या, सोना एलाजाईन्स प्रकरण आपण केलं. साताराची एमआयडीसी न वाढण्याचे कारण हे फक्त उदयनराजे आणि त्यांचे त्यांचे बगलबच्चे आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला दमदाटी करायची, हप्ते मागायचे, युनियन काढायची, आमची माणसे घ्या, अन्यथा बघतो अशा प्रकारांमुळे सातारा एमआयडीसी वाढत नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगण्याचा काही प्रयत्न करू नये. सगळ्या एमआयडीसीची वाट लागली, कारखानदार न येणे याचं मूळ कारण हे आपले दिव्य खासदार उदयनराजे हे असल्याचा आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

सातारा येथील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीमध्ये खासदार उदयनराजे यांनी उडी घेतल्याने हा वाद आता विकोपाला गेलेला पाहायला मिळत आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, खासदार किती आले तरी आम्ही गुन्हे दाखल करणार. तुमची बाजू हायकोर्टात मांडा, तिथे हायकोर्ट काय म्हणते ते बघू या. आम्ही काही पाकिस्तानमधून आलो आहे का. सर्वजण व्यवसाय करतात, आम्हाला गुंतवणूक करायची होती. आम्ही जागेत केली, आम्ही जी जागा घेतली होती ती कारखान्यासाठीच वापरतो आहे. तिथे आम्ही हॉटेल किंवा घर बांधत नाही तिथे इंडस्ट्री सुरू व्हावी, यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. आमचे प्रयत्न सातारच्या दृष्टीने चांगलेच आहेत.

महाराष्ट्र स्कूटरची आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा पडून आहे, याचा काहीच फायदा साताऱ्याला नाही. अनेक वर्ष महाराष्ट्र स्कूटर सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यात यश आले नाही. पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी लिक्विडेशन मध्ये गेली होती. त्यांची जागा अशीच पडून होती बँकेच्या लिलावातून आम्ही घेतली असल्याचेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.