सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
‘हर घर झेंडा’ या मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल ते 14 ऑगस्ट या कालावधीत नियमित घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना मोफत राष्ट्रध्वज देण्याचा निर्णय सातारा नगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयानंतर मोहिमेची प्रत्यक्ष अंलबजावणी पालिकेकडून केली जाणार आहे.
सातारा नगरपालिकेची प्रशासकीय सभा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. पार पडलेल्या सभेसमोर एकूण 67 विषय मंजुरीसाठी घेण्यात आले होते. यामध्ये केंद्र शासनाच्या ‘हर घर झेंडा’ या उपक्रमाचा लाभ साताऱ्यातील प्रत्येक नागरिकाला मिळावा यासाठी नगरपालिकेने निर्णय घेतला आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या या निर्णयामुळे पालिकेत घरपट्टी भरणाऱ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या मोहिमेचीही योग्य प्रकारे अंलबजावणी होणार आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या निर्णयाचे सातारा शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे.