व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बनावट ताडी कारखान्यावर छापा : सहा लाखाचा मुद्देमालासह 4 जणांना अटक

सातारा | नागठाणे (ता.जि. सातारा) गावचे हद्दीत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा क्लोरेल हायड्रेडचा वापर करुन बनावट ताडी तसेच मानवी शरीरास घातक व विषारी क्लोरोल हायड्रेट तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात 4 जणांना अटक करण्यात आलेली असून 5 लाख 97 हजार 110 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, राज्य उत्पादन शुल्क, आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक अनिल चासकर यांच्या आदेशान्वये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा विभागाने छापा टाकला. या छाप्यात सुहास हणमंत सांळुखे, विजय जयसिंग सांळुखे, मे. कानी ओवसिस कार्पोरेशन, अतित (ता.जि. सातारा) कंपनीचा मालक मिलींद तुकाराम घाडगे सर्व (रा. नागठाणे ता.जि. सातारा), राजू व्यंकट नरसय्या भिमानाथीनी (रा. नेवोलीनाका, डोंबिवली कल्याण पूर्व जि.ठाणे) यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. वरील सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली असून गुन्हयातील संशयीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

सदर कारवाईमध्ये 150 लि क्लोरेल हायड्रेड युक्त बनावट ताडी, 735 कि.ग्रॅ. क्लोरेल हायड्रेड, एक चारचाकी वाहन एक 200 लि. क्ष.चा प्लॅस्टिक बॅरल व एक कॉम्प्रेसरसह एकूण 5 लाख 97 हजार 110/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक के.बी. बिरादार, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, सहा. दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, जवान सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जिवन शिर्के, किरण जंगम यांनी भाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास श्री. के.बी.बिरादार दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत.