पावणेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोड्या, दरोडे टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. एकूण 85 घरफोड्या केल्याची कबुली अटकेतील संशियतांनी दिली असून त्यांच्याकडून 34 घरफोड्यातील 14 लाख रूपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जावेद अनिल काळे (रा. फडतरवाडी, ता. खटाव), करण वरिसऱ्या काळे (रा. भांडेवाडी, ता. खटाव), निकाल लत्या काळे (रा.कोकराळे, ता. खटाव), संकेत आलीशा काळे, अभिजीत मंज्या काळे (दोघे रा. सिध्देश्‍वर कुरोली, ता. खटाव), ऋतुराज भावज्या शिंदे (रा. काटकरवाडी, ता. खटाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

खटाव तालुक्‍यातील मांडवे, सिध्देश्‍वर कुरोली, पुसेसावळी येथे जून 2019 मध्ये याच संशयितांनी दरोडे टाकले होते. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा संशयितांच्याकडे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा कसून तपास करत होती. तब्बल एक महिन्याच्या तपासानंतर अटकेतील संशयितांनी सातारा जिल्ह्यातील खटाव, माण, कोरेगाव तर सांगली जिल्ह्यात मिळून एकूण 85 घरफोड्या केल्याची कबुली दिली.

Leave a Comment