सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
ऑनलाईन रम्मी खेळण्याची सवय लागल्याने अशात पैसे नसल्याने एका पठ्ठयान चक्क चारचाकी गाड्यातील बॅटऱ्या चोरी करण्याचा नर्णय घेतला. दररोज बॅटर्या करून तो त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ऑनलाईन रम्मी खेळायचा. सातारा ऑइलीसानी अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे चोरट्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 4 लाख 7 हजाराच्या किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सातारा शहरातील एमआयडीसी महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोड, पेट्रोलपंप अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यास सातारा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे ऑनलाईन रम्मी खेळणाऱ्या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील एमआयडीसी महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोड, पेट्रोलपंप अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटरी अज्ञात चोरट्यांकडून चोरी केल्या जात होत्या. याबाबत सातारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पोलीसाकडूनच रात्रीच्यावेळी या ठिकाणी पेट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला. त्यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सातारा शहरातून विविध ठिकाणी असलेल्या ट्रक, टॅम्पो, जेसीबी मशीन अशा वाहनाच्या एकूण ३६ बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगितले.
तसेच अधिक चौकशी केली असता त्याने ऑनलाईन रम्मी खेळण्याची सवय लागल्याने व त्यामध्ये खेळण्यासाठी पैसे लागत होते. म्हणून बॅटरी चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपण रम्मी खेळत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल, बॅटऱ्या असा एकूण ४ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, ज्या वाहनधारकांच्या मागील २-३ महिन्यापूर्वी बॅटऱ्या चोरी झालेल्या आहेत. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक रापू संगर, पोलीस उपअधिक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक भगवान किर, श्रीमती वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज खाणे, अमय साबळे, विक्रम माने, विकास शिंदे, रोहित बाजारे, संतोष कचरे, गणेश मोंग सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.