सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याला मोठी सैनिकी परंपरा आहे. सातारा जिह्यातील प्रत्येक गावातील व्यक्ती ही भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असल्याचे सर्वांना माहित आहे. मात्र देशाचे कर्तव्य आणि जबाबदारी बजावत असताना त्यांना देखील कुटुंबासहित इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. यामध्ये त्यांना देखील बऱ्याच अडचणी येत असतात. त्यांच्या ह्या अडचणी जाणून घेण्यासाठी सातारा पोलिसांनी आता पुढाकार घेतला आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलिस परेड मैदान येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत स्वत: व सर्व पोलिस स्टाफ उपस्थित राहून सर्व सैनिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या संदर्भात माहिती स्वतः सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्याची संपूर्ण देशात सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची जण ठेवून पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाची सुरुवात ७ डिसेंबर २०१९ म्हणेजच येत्या शनिवार सकाळी ८ ते २ या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आजी – माजी सैनिकांनी उपस्थित रहावे असं आवाहन सातारा पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.