सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरोनामुळे रद्द झालेली सातारा पोलीस दलालतील 58 जागांची भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या भरती प्रक्रियेत कोणी मार्क वाढवून देण्याचे आमिष देत असेल तर बळी पडू नका. जर कोणी असे सांगत असेल तर त्वरित पोलीस अधिक्षकांशी संपर्क करावा. अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.
येथील पोलीस कवायत मैदान येथे 58 जागांसाठी झालेल्या शारीरिक चाचणीत तब्बल 325 उमेदवारांची चाचणी पूर्ण झाली. या भरतीसाठी सातारा जिल्हा पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे हे स्वतः बारीक लक्ष ठेऊन होते. आता थोड्याच दिवसात मेरिट नुसार अंतिम 58 जणांची यादी जाहीर होणार आहे. कोरोनामुळे 2019 सालापासून पुढे ढकललेली होती.
पोलीस अधीक्षक म्हणाले, पोलिस भरती प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पडलेली आहे. कोणत्याही प्रकारची वशिला किंवा अमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये. याबाबत कोणतीही चुकीची गोष्ट अथवा गैरमार्ग अढळल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क करावा.