सातारा प्रतिनिधी । राज्यातील अनेक ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध झालेल्या नाहीत. साताऱ्यातील निगडी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाकडून ज्या त्या वेळी वीज आणि पाण्याचा विषय हाताळला जात नसल्याने लोकांच्या समस्यांत वाढच होत असल्याचं चित्र पहायला मिळालं. मागील ५ दिवसांपासून गावात पाणीच न आल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांना कार्यालयातच घेराव घातला.
यावेळी वायरमन आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. गावकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला होता. सतत खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मार्ग काढावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.