सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 45 वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलाचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड- 19 बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली.
या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास 15 वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थित आहे असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
दरम्यान, कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी
मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न