सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 228 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडिकर यांनी सदर माहिती दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनारुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सातारा जिल्ह्यात ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी रुग्णसंख्या चार हजार पार गेल्याने ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या अाहेत.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता ४ हजार ५२ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 36 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 130 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.