सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात वाढ होत आहे. शुक्रवारी दिवसभरात सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 669 नवीन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.
आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब – 239, एन सी सी एस -24, कृष्णा -51, अँटी जन टेस्ट ( RAT) – 339 , खाजगी लॅब – 16 असे सर्व मिळून 669 जण बाधित आहेत अशी माहिती आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात आजवरच्या सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण असून जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 887 वर पोहोचली आहे. तसेच आत्तापर्यंत 6 हजार 787 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात 357 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.