चिंताजनक! कोरोनाचा मृतांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना महामारीने जगभरात थैमान घातलं आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयानं वाढ होत आहे. भारतात दरदिवशी ६० ते ७० हजारांच्या वर कोरोनाबाधित आढळत आहेत. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्य संख्येतही वाढ झाली आहे. म्हणूनच कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ६३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाली. यानंतर कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आली. भारतात यापूर्वी १० लाख व्यक्तींमागे मृत्यूंची संख्या ही ५ इतकी होती. ती आता १० लाख व्यक्तींमागे ४५ इतकी झाली आहे. तर प्रत्येक १० लाखांमागे रुग्णांची संख्याही आता वाढून २ हजार ५५४ इतकी झाली आहे. भारतात मागील ३ दिवसांमध्ये दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. शुक्रवारीही ७७ हजारांपेक्षा अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता वाढून ३४ लाखांच्या वर गेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment