धक्कादायक! सातारा जिल्ह्यात एका दिवसात सापडले तब्बल १ हजार ८६ नवे कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 86 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात कोरोनाचा प्रसार अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पाहता पाहता पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या प्रमाणात कोरोनारुग्ण सातारा जिल्ह्यात सापडत असल्याने नागरिकांतही भितीचे वातावरण  पसरले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा आता 23 हजार 949 वर पोहोचला आहे. तसेच आज पर्यंत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 14 हजार 567 वर गेली आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ५२४ रुग्णांचा मृत्यू झाल आहे.