सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 96 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 507 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तसेच जिल्ह्यात आज दिवसभरात 201 नवीन कोरोना बाधित सापडले आहेत.
जिल्हा रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 59, कोरेगाव येथील 8, वाई येथील 58, खंडाळा येथील 8, रायगाव येथील 51 , पानमळेवाडी येथील 51, महाबळेश्वरयेथील 25, दहिवडी 101, म्हसवड 15, पिंपोडा 25 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 66 असे एकुण 507 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
राज्यात आज 6218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5869 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2005851 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53409 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.
सातारा जिल्ह्यात आज 201 बाधितांची वाढ
आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब 176 (832 ), कृष्णा -02 (66), खाजगी – 12 ( 118) ऍन्टीजन -11 (446) असे सर्व मिळून 201 (1462 ) जण बाधित आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group