सातारा जिल्ह्यातील 22 नवे कोरोनाग्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  

आज आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. वाई पोलीस ठाण्यातील १२ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या सहवासातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.कराड तालुक्यातील तळबीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कासणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला, माण तालुक्यातील बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान जिल्हयात संपुर्ण लाॅकडाउन राहणार आहे. १७ जुलै ते २२ जुलै जिल्ह्यात १००%  लाॅकडाऊन लागले आहे.