सातारा जिल्ह्यात २५ नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1361 वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 25 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील एकुन कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १ हजार ३६१ वर पोहोचली आहे.

बाधित अहवाल आलेल्यांची आकडेवारी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. सातारा तालुक्यातील जिहे येथे 1, दौलतनगर येथे 1, अपशिंगे येथे 1, सातारा शहरात कारागृह येथे 3, रविवार पेठ येथे 3, बुधवार पेठ येथे 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 3 कर्मचारी, कोरेगाव तालुक्यातील खडखडवाडी येथे 1, चंचली येथे 1, कोरेगाव शहर येथे 2, आसनगाव येथे 1 ल्हासूर्णे येथे 1, वाई तालुक्यातील आसले येथे 1, कराड तालुक्यतील तारुख येथे 3, शामगाव येथे 1, येळगाव येथे 1 अशा एकूण 25 नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत ८१३ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत ५५ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ग्रामिण भागात नवीन रुग्ण सापडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरता कंबर कसत असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.