Sunday, May 28, 2023

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची मॅरेथॉन मुलाखत; चीन पासून महाराष्ट्रापर्यंत सर्व मुद्द्यांवर गप्पा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे व्यक्तिमत्व नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. त्यांचा राजकारणातला अनुभव आणि त्यांची राजकारणाची पद्धत ही नेहमीच सर्वांच्या औत्युक्याचा विषय बनली आहे. शिवसेनेचे नेते तसेच सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे.राऊत यांनी यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केल्याचे आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे.

‘आज मी ‘सामना’ साठी वरिष्ठ नेते शरद पवार जी यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. चीनपासून महाराष्ट्रपर्यंत सर्व घटनांवर त्यांनी खुलेपणाने आपले विचार व्यक्त केले आहेत. मुलाखत सामना स्टाईल मध्ये जोरदार ढंगात झाली असून लवकरच प्रकाशित व प्रसारित होईल’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

संजय राऊत यांच्या ट्विटनंतर पवार यांची ही मुलाखत वाचण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काहींनी या मुलाखतीमुळे आघाडीत वितुष्ट आहे हा लोकांचा गैरसमज दूर होईल अशा कमेंट काहींनी केल्या आहेत. लवकरच ही मुलाखत प्रकाशित होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.