सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. बुधवारी रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात दिवसभरात 304 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या ३ हजार ४१४ कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 197 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा 6 हजार 504 वर पोहोचला आहे. तसेच जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 2893 आहे.