Saturday, March 25, 2023

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दहशत थांबेना; आज सर्वाधिक 571 रुग्णांची नोंद

- Advertisement -

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नव्या सर्वाधिक 571 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता 15962 झाली आहे. त्याच प्रमाणे 301 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या 4354 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 10981 रूग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात आज 08 मृत्यू झाले असून आतापर्यंत एकूण 627 रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आज 520 पॉझिटीव्ह रुग्णांना होम आयसोलेशन ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे- जळगाव शहर 131, जळगाव ग्रामीण 47, भुसावळ 28, अमळनेर 17, चोपडा 56, पाचोरा 14, भडगाव 9, धरणगाव 40, यावल 17, एरंडोल 17, जामनेर 30, रावेर 16, पारोळा 30, चाळीसगाव 78, मुक्ताईनगर 21, बोदवड 0  अशी रुग्ण संख्या आहे.

- Advertisement -

“त्वरीत तपासणी, त्वरीत निदान व त्वरीत उपचारामुळे जळगावचा दोन महिन्यापूर्वी 12 टक्के असलेला कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यूदर आज प्रथमच 3.92 % पर्यत कमी झाला आहे, हे  आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या उपाययोजनांचे फलीत आहे” असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.