सातार्‍यात सापडला ४ था कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही ४ वर पोहोचली असून आज एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे.

 काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी एका 54 वर्षीय पुरुष नागरिकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तो कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याचबरोबर 31 वर्षीय युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा अहवाल पुणे एन.आय.व्ही यांनी कळविले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 4 झाली असून आज सातारा येथे 4 व कराड येथे 7 अनुमानित नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

सदर कोरोना बाधित रुग्ण हा सातारच्या ग्रामीण भागातील असून वाळकेश्वर, मुंबई येथे मागील १४ वर्षापासून खाजगी कारचालक म्हणून एकटा राहत होता. ८ मार्च २०२० रोजी टेम्पोने गावी आला. दोन दिवसांपूर्वी ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यास मधूमेहाचा त्रास असून त्यावर उपचार चालू आहेत. सद्यस्थितीत त्याची प्रकृती स्थिर असुन त्यावर मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. या कोराना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व निकट सहवासितांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार मरकज काळात दिल्ली येथे भेट दिल्याने सातारा जिल्ह्यातील 25 ते 27 वयोगटातील 4 पुरुष नागरिकांना आज 5 एप्रिल रोजी कोविड- 19 अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 1 ते 85 वयोगटातील 5 पुरुष व 1 महिला अशा 6 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून यातील 30 वर्षाचा पुरुष हा कोरोना बाधित रुग्णांचा निकट सहवासित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच परदेश प्रवास करुन आलेल्या एका 67 वर्षीय पुरुषास देखील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. या सर्व 11 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात येत असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 2 कोरोना बाधित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने 14 दिवस पूर्ण झाल्याने तपासणीसाठी एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९० वर, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

 

Leave a Comment