सातार्‍यात १९ वर्षीय युवक कोरोना पोझिटिव्ह, कोरोग्रस्तांची संख्या ७ वर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५०० पार गेली असताना आता सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका युवकाचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासित १९ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात अनुमानित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले होते.  या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुना रिपोर्ट हा कोरोना (कोव्हीड -19) पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे हा युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरन्यान, सदर रुग्णावर मार्गदर्शक सुचनेनुसार कोरोना संसर्गाचे उपचार चालू आहेत. सध्या सदर युवकाची प्रकृती स्थिर असून आता त्याच्या संपर्कात कोणकोण आले होते याचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Comment