एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ मारामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या 9व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची होऊन यामध्ये मारहाणीची घटना घडली आहे.सातारा आगारातील वाहक क्रमांक 6623 राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांनी चिडून जाऊन डोक्यात दगड घातला आहे.

दरम्यान, घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या :

हायवे वर लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सहकारमंत्र्यांच्या सह्याद्रिवर : एकरकमी एफआरपीसाठी उद्या रयत क्रांती शेतकरी संघटना धडकणार

IRCTC – तुमचे ट्रेनचे तिकीट हरवल्यास आता काळजी करू नका, रेल्वेच्या ‘या’ नियमांद्वारे तुम्हांला होईल मदत

Ration Card : आता घरबसल्या एका क्लिकवर बनणार रेशनकार्ड, कसे ते जाणून घ्या

Bank Holidays – ‘या’ शहरांमध्ये पुढील 5 दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्यांची लिस्ट पाहून करा महत्वाची कामे

Leave a Comment