अकरावीतील तरूणीला व्हायचं होत पोलिस… मात्र पैसे नसल्याने उचलले टोकाचं पाऊल

0
211
sucide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यातील वडूथ याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय तरुणीनं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आयुष्याचा शेवट केला आहे. पोलीस बनण्यासाठी पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने युवतीने टोकाचे पाऊल उचलले. सारिका ज्ञानेश्वर सकटे (वय-17) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे.

सारिका हिने पोलीस बनण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं. पण पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणातून तिने भयावह पद्धतीने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सातारा शहरातील एका महाविद्यालयात ती अकरावीच्या वर्गात शिकत होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे पोलीस व्हायचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं.

पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेऊन स्वप्न साकरता येईल, असं तिला वाटत होतं. तिच्या काही मैत्रिणींनी देखील पोलीस भरती अकॅडमीत प्रवेश घेतला होता. त्यामुळे तिनेही आपल्या घरी अकॅडमीत प्रवेश घेण्यासाठी पैसे मागितले होते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबीय पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे तिला नैराश्य आलं होतं. पैसे नसल्यानं पोलीस व्हायचं स्वप्न धुसर होऊ लागलं होतं. याच विवंचनेतून अखेर 17 वर्षीय सारिकानं आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्याचं समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here